स्वप्न ......एक धुंदी ..!

Started by महेश मनोहर कोरे, January 13, 2012, 11:38:26 PM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

स्वप्ने स्वप्नी येता रंगी
उजळत जाती धवलअंगी
लाजून पाहती मोरपंखी
असतातच ती स्वछंदी....

गुलाबी थंडीतील स्वप्ने मग
येतात सहज अंगणी ...
घर करुनी राहती
जणू चांदणे मधुरांगणी....

स्वप्नांचा साजच निराळा
मग धुंदसुद्धा होते मन
आवरत नाही आपल्यालाच 
स्वप्ने बांधती त्याला तोरण

काही स्वप्ने वाटती मधुर
तर काही उनाड पाखरे
काहींची वाटते भीती....
तर काही आणती शहारे

या स्वप्नांचीही मग
वाटते मजा मला
विचार येतो..... 
आपणहि पाहू स्वप्नामध्ये
या स्वप्नांच्याच रासलीला

नंतर जाणवत .......
आपल मनच हे वेड
स्वप्नांना शोधत बसलंय
जे स्वतःच आहे मनकवड...........

आपल मनच आहे वेड
स्वप्नांना शोधत बसलंय
जे स्वतःच आहे मनकवड...........

                                             महेश मनोहर कोरे
                                     ९९६०२६९१९३. पुणे