जात अन प्रेमविवाह .....?

Started by महेश मनोहर कोरे, January 17, 2012, 11:12:32 PM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

एक मुलगी ...मला सतत पाहणारी ...

कदाचित इतर वेळी माझी आकृती बनवणारी ....

आणि मी ..........तिची माहिती काढली ..

सर्व काही ठीक पण .....दोघांची जात वेगळी ..

एकदा ठरवलं तिला सांगायचं ....

आणि ....................ही कविता....



कस सांगू तुला सखे ?

या आयुष्याच पाणी आहे संथ

होणार नाही आपला प्रेमविवाह

कधीच मानणार नाही आमचा पंथ



" ती म्हणाली " ओळख नसतानाही तुला

कशी सुचली या विवाहाची रंगत

तिला सांगितलं खर ...

माझ्या लग्नाची बसणार एकच पंगत



माझ उत्तर ऐकत ती 

पाहता  झाली सुन्न ........

तिचा उतरलेला चेहरा पाहून

माझ मन झाल खिन्न  ............



पुढचे काही क्षण

हवेत विरले निवांत

तेवढ्या वेळातच माझे

मन फिरले आसमांत



दृढ निश्चयाने तिचे

आग ओकू लागले डोळे

काहीतरी बोलून,तोडणार ती

आता स्व:ताच्याच मनाचे डोहाळे



बोलली ती, आपण राहू सुखासुखी

पण तोड सर्व नाती.......

मी म्हणालो, माझी पण आहे तयारी

पण काय देऊ आईवडिलांच्या हाती ?



ऐकून माझे उत्तर

तिने घेतला दीर्घ श्वास

मन म्हणत होत आता 

तोड या उतरंडीची रास



कदाचित वाटत असेल तिला
मी टाकेल सुटकेचा नि:श्वास
पण शक्य नव्हत सोडन
आतापर्यंत पोसलेल्या आईवडिलांची कास

मी शेवटच नाही म्हटलं
अन गेली ती निघून ...
हलका कापूस झाला डोईजड
गेला प्रेमानं भिजून ....

पेटते निखारे घेऊन
का आले हे जातधर्म ....?

पेटते निखारे घेऊन
का आले हे जातधर्म .....?
राख झाल्याशिवाय या निखाऱ्यांना
कळणार नाही प्रेमाचे मर्म.....

                                         महेश मनोहर कोरे.
                                         ९९६०२६९१९३. पुणे 

विवेक राजहंस...


विवेक राजहंस...


shashikant tile

hya jat dharma pai ketekanche hrudya tutatat..
pan je jodnyacha praytn kartat tech tiktat..

kadhi kadhi wegal rahnyatch doghanch bhal asat..
nahitar he jag apale sanskar kadhayala tapalel asat..

महेश मनोहर कोरे

@ shashikant.....बरोबर आहे आपल म्हणन .......1


salunke.monika

मी शेवटच नाही म्हटलं
अन गेली ती निघून ...
हलका कापूस झाला डोईजड
गेला प्रेमानं भिजून ....
                 khup chhan..... mastach

Tanuja Datkhile


महेश मनोहर कोरे