प्रेम .....मराठीतील एक शब्द .

Started by Nitesh Hodabe, January 18, 2012, 01:44:14 PM

Previous topic - Next topic

Nitesh Hodabe

प्रेम .....मराठीतील एक शब्द ...पण किती महत्व आहे ना या शब्दाला .....!
प्रत्येकाला प्रेम करायचं आहे , त्याला जवळ बोलावयाचय ....त्याच्या
कुशीत डोक ठेऊन शांतपणे झोपी जावस वाटत....अशा किती तरी भावना आपल्या
मनात निर्माण होतात ....
मग निसर्ग नियमाने माणूस प्रेमात पडतोही ....
काहींना प्रेमाचं सुख मिळत तर काहींना प्रेमभंगाचा चटका .....
मुलांना वाटत मुली वाईट असतात तर मुलीकुठल्याही मुलावर विश्वास
ठेवायला तयार नसतात .....
खर तर मित्रांनो ....
मुलांचं प्रेम हे काल्पनिक असत तर मुलींचं वस्तूस्थितीवर आधारित .....
आणि दोघेही बरोबर असतात ...प्रश्न येतोसामोपचाराचा ...पण ते होत नाही..
प्रत्येकाला आपला ' स्व ' अन " भविष्य "महत्वाच वाटत ...अन मग
त्यामुळे कुठेतरी या गोष्टींचा भडका उडतोच अन मग प्रेमाची वाट लागते .......
...प्रेम अन प्रेमभंग ही एकाच रथाची दोन चाके आहेत..... एक चाक उचलून
हाताला काहीही लागत नाही.....प्रेमभंगाच ा चटका मात्र सतत भेटतो....
याचा विचार करा .....
आणि
" एकांती डोहात बुडणे हा प्रेमरोगावरील रामबाण उपाय कधीच होऊ शकत नाही ".....

महेश मनोहर कोरे