गुलाबी थंडीत

Started by Marathi Kavi, January 19, 2012, 06:11:17 PM

Previous topic - Next topic

Marathi Kavi

गुलाबी थंडीत


मारव्याचे एकाकी स्वर, मावळतीला सूर्याचा अस्त
बावरलेली संध्याकाळ, गारवा लपेटण्यात व्यस्त

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू
लाजत धुके हळूच, लागते फेर धरू

आखडलेले शरीर, प्रफुल्लित मन
पुन्हा एकाकी मी, सोबत तुझी आठवण

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा
घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

कुड्कुडना-या थंडीतली, उबदार तुझी मिठी
उष्ण तुझे श्वास ,फुललेले माझ्यासाठी

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे
थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास
गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवा



-- Author Unknown


हि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.

Pravin5000


महेश मनोहर कोरे


bhanudas waskar

खरच दत्त प्रसाद............
तिची ती आठवनच पूरी आहे
आयुष्य जगण्यासाठी
ती सोबत नसतानाही
रात्र गुजारन्या साठी.
तिच्या जाण्याने तिच्यावरील प्रेम काही कमी झाले नाही
तिच्या सोबतचे क्षण मी विसरलो नाही
आज ही तीच आसतित्व आहे माझ्या जीवनात
आज ही ती आहे माझ्या मनात


                     ***********भानुदास************