भाग्य

Started by शिवाजी सांगळे, December 07, 2025, 10:29:50 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भाग्य

मानले तर, सारे अतूट धागे येथल्या नात्यांचे 
कोण करतो तेव्हा विचार उसवल्या धाग्यांचे!

होता जरी ओढाताण,दमछाक सांभाळताना
ओझे का होते या फांद्याना, डवरल्या पानांचे?

रोजचेच नक्षीदार कष्ट, जो जीव रोज करतो
कोणते कौतुक त्यास हो, विनल्या जाळ्याचे?

सजावे कुंतली,वा समर्पित व्हावे ईश चरणी!
ठरवायचे कोणी?भाग्य ते उमलल्या फुलांचे?

मान,अपमान,वादविवाद,दुर्लक्ष काही शब्दां
होते गाणे मात्र, मोजक्याच गुंफल्या शब्दांचे!

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९