वाद संवाद

Started by शिवाजी सांगळे, December 11, 2025, 12:35:07 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वाद संवाद

संवाद होऊ देत, आता साद नको
कालपर्यंतच्या गोष्टींवर, वाद नको

समजून घेताना,तु मला न् मी तुला
अन्य दुसऱ्या, विषयाचा नाद नको

ठिक होते सारे  सुरळीत चाललेले
दोघांत आता,परक्याची याद नको

पुरे प्रशंसा, एकमेकांना आपली ही
फुकटात मधे तिसऱ्याची दाद नको

घ्यायचेच जर जुळवून आपल्याला
होऊ देत संवाद,उगाचच वाद नको

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९