वेडे मन माझे

Started by Prashant Hulle, December 12, 2025, 11:26:00 AM

Previous topic - Next topic

Prashant Hulle

कळता ही न कळते मला
वळताही न वळते मला
का होते असे कळत नाही मला
पाहतो तुला आणि पाहतच राहतो मी तुला
विसरुनी जातो भान जेव्हा स्मरतो मी तुला

असे तुझे सौंदर्य मनी माझ्या घर करून गेले
तू नसता समोरी असण्याची जाणीव करून गेले
तू नसतेस सोबत माझ्या तेव्हा ओसाड वाटते हे जग सारे
असे का होते माझ्यासोबत काही कळत नाही मजला

हे वेडे प्रेम माझे मलाच नाही उमजले
इतके कसे प्रेम माझे तुझ्यावरती जडले

विसरून मी स्वतःला तुझ्याभोवती फिरू लागलो
तुझ्या स्पर्शाच्या आठवणींच्या कुशीत गुंतू लागलो

तू नसलीस तरी मनात तुझी चाहूल लागत राहते
तुझ्या नावाचेच सूर जपताना रात्रभर झोप उडते

तुझ्यासोबतच्या क्षणांना आठवूनी एकटाच हसत राहतो
वाटते तुझ्यासोबत खूप बोलावे पण येता तू समोरी अबोल मी होऊन जातो
असे का होते मजला काही कळेनासे झाले

हे वेडे मन माझे तुझ्यामध्ये इतके कधी गुंतले
विसरून साऱ्या जगाला तुझे होऊन बसले
प्रशांत अनंत हुल्ले
(Pintos)