महापुरुष--कवी- भूषण भुवड

Started by bava1984, January 25, 2012, 01:52:50 PM

Previous topic - Next topic

bava1984

     महापुरुष

चर्र चर्र पावला खाली
सुकली पाने कणहत होती
प्राण अखेरी जाता जाता
काहीतरी म्हणत होती

एक पिंपळ निर्ढावलेला
चिरा फोडून वर गेला
एक पार वारूळनी
बघता बघता सर केला

मी गेलो उगाच तरीही
देवलीने स्वागत केल
विधवापण कपालाच
उगा मन डागत गेल

धावत धावत महापुरुष
आला त्याने मिठी दिली
आसवांची ओंजळ आम्ही
एकमेकात रीती केली

कुठ होतास बाबा तू
किती दिस आला न्हाई
खरच सांगतो तुझी शप्पथ
तुझ्या बिगर मजा न्हाई 

मी म्हटल बराय सध्या
मुंबईत काम करतो आहे
येता जाता लटाकतो आहे
दिवस असाच सरतो आहे

बर तुझा ठावठिकाणा
अधिरतेने मी विचारल
बोलता बोलता डोळ्यात
त्याच्या पाणी दाटून आल

मी मसण्या कुठ जाणार
कित्येक दिस पडून आहे
तू गेल्यापासून तुझ
देण इथ सडून आहे

हल्ली मी ऐकलय
तू दुसरा घरोबा केला
नवीन देव गावला
तसा जुना भैरोबा मेला ?

काढ बाबा काढ तू
दिंड्या अन् पद यात्रा
पाया पडतो इसरु नको
गावाकडची जत्रा

महापुरुष हाय मी
ऐरा गैरा देव न्हाय
तुझा महान पुरखा मी
मला कोनाच भेव न्हाय

सोन नाण नको मला
नको मुकुट अन् सिंहासन
येत जा वरचेवर
तुझ घर मी राखन

घर परड राखीन मी
त्यांची चिंता करू नको
नाव माझ घे आणि
मागे वळ पण हरु नको
-------भूषण भुवड ९७७३०६७९३४ पनवेल

केदार मेहेंदळे