असा मी स्वच्छंदी माणूस

Started by gurjar.makarand, January 25, 2012, 03:14:57 PM

Previous topic - Next topic

gurjar.makarand

गडगडाटी मेघा कितीही, धाड धरेवर गारांचा पाऊस,
भ्याड नसे मी, नसे पळपुटा, असा मी स्वच्छंदी माणूस ||धृ||


थयथयाती विजे किती तू, नाच ती विक्राळून काया,
डळमळणारा नसे कधी मी, छेदी ना भय कधी हृदया.
काय काजव्यापरी तेवती, हा तुझा प्रकाश केविलवाणा,
तिमिरासही धाडून दिधले, मी त्या यमसदनाला.
उगा नको ते नेत्र फाडू तू, पडेल तव त्या अश्रूंचा पाऊस,
भ्याड नसे मी, नसे पळपुटा, असा मी स्वच्छंदी माणूस ||१||
 
का किंचाळसी तू कोण कोठला, असे चक्रवात,
हिम्मत साठव, मग धाव रे, करण्या तू मम घात.
भरले खच्चून कापर सध्या, तव सापळ अंगी,
पळ काढशील क्षणात टाकून, मज सामोरी नांगी.
उगा कशाला व्यर्थ मनी ती, पोक्त दर्पोक्तीची हौस,
भ्याड नसे मी, नसे पळपुटा, असा मी स्वच्छंदी माणूस. ||२||


क्षणभर डुंबून जा तू सागरा, डोही आनंदाच्या,
मिळो क्षणिक क्षण फुगण्या, तव त्या गर्वाचा भाता,
बंद करू दे, द्वार तुझे ते, त्या लाटांना अफाट,
ठाव असे मज, त्यात कशी ती, काढायची वाट,
घालू दे त्या लाटांना वेड्या, मनसोक्त हैदोस,
भ्याड नसे मी, नसे पळपुटा, असा मी स्वच्छंदी माणूस ||३||
  कवी : मकरंद गुर्जर


केदार मेहेंदळे