गणित

Started by salunke.monika, January 27, 2012, 12:45:51 PM

Previous topic - Next topic

salunke.monika

का कोणास ठाऊक पण
आयुष्याचे सारे गणितच चुकले
उनाड पक्षी होऊन उडायचे होते
पण बंद दरवाज्यातच आडकून पडले

का कोणास ठाऊक पण
आयुष्याचे सारे गणितच चुकले

आयुष्यातील पहिले पाऊलच
कदाचित चुकीचे पडले
जन्मदात्यांचा आधार होण्याऐवजी
त्यांच्यासाठीच एक कर्तव्य बनले

का कोणास ठाऊक पण
आयुष्याचे सारे गणितच चुकले

ज्ञानाचा दिवा प्रकाशित करून
उजळवून टाकायचे होते जग सारे
पण त्या दिव्याला तेवत ठेवण्यासाठी
तेलच नाही मिळाले, हे होते खरे ..

का कोणास ठाऊक पण
आयुष्याचे सारे गणितच चुकले

माझ्या ह्या छोट्याश्या जगात
नेहमीच सर्वांपेक्षा लहान मी राहिले
पण परिस्थितीने  सदैव
सर्वांपुढे  मला महान होते केले

खरच का कोणास ठाऊक पण
आयुष्याचे सारे गणितच चुकले

प्रेमरुपी भवसागरात नव्हते कधी गुंतायचे
पण त्याच्या प्रेमापुढे , मी मलाच होते विसरले
नव्हते होणार  सुंदर स्वप्न साकार हे
माहित असतानाही त्याच्याच प्रेमात गुंतत मी गेले

का कोणास ठाऊक पण
आयुष्याचे सारे गणितच चुकले

जीवनाची सूत्रे माहित असतानाही
तीच चूक मी करण्यास निघाले
माझ्यातील " तू " ला नाकारून
आयुष्यासाठी उधारीचा श्वास घेण्यास हो मी म्हणाले

का कोणास ठाऊक माहित असूनही
आयुष्याचे गणित चुकवण्यास पाऊल मी उचलले
आयुष्याचे सारे गणितच चुकले   

Prakash Yardi

Monica, you have composed a nice and insightful poem. I expect that the woman's observations in the poem reflect almost all women's thinking. 

jyoti salunkhe

kavita khup chan aahe......................... :)

vanita Abhijit

True fact about mostly womens.

Sushil Sawant

Very good composing. keep it up.

केदार मेहेंदळे


rutekar486

Excellent, ekdam mastach