तिच्या कविता

Started by शिवाजी सांगळे, December 16, 2025, 06:14:06 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तिच्या कविता

ती नाही, पण तिच्या कविताच स्मरतात आता
भासती मृगजळ आयुष्याच्या वाळवंटात आता

सावलीत तारकांच्या..ओथंबल्या कधी भावना
रात्रंदिन, कोणत्याही प्रहरी लुकलुकतात आता

हळूवार स्वप्नांचे हिंदोळे..वाऱ्यावर त्या घेतलेले
गहिवरल्या अस्तित्वाच्या जाणीवा देतात आता

पुन्हा कधी..अचानक आभाळ व्यापता मनाला
निल नभाखाली..स्वप्ने डोळ्यात दाटतात आता

नसली जरी ती, तिच्या कविता स्मरतात आता
टायटॅनिक गीत हलकेच ओठ पुटपुटतात आता

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९