पोपटराव हिरवे पाटील

Started by shashaank, January 31, 2012, 10:53:25 AM

Previous topic - Next topic

shashaank

पोपटराव हिरवे पाटील...

हिरवी शाल, लाल चोच
गळ्याभोती काळा गोफ

कसले भारी दिस्ता राव
पोपटराव पोपटराव

मिरच्या खाता तिखटजाळ
पेरुबरोबर ओली डाळ

शिट्ट्या बडबड कित्ती कित्ती
झोके घेता दांडीवरती

आवाजाची मस्त नक्कल
कुठून एवढी आणली अक्कल

कुण्या गावचे तुम्ही राव
हिरवे पाटील पोपटराव.....

-   शशांक पुरंदरे. 

केदार मेहेंदळे

mast..... balgit lihayla khr kathin ast. chan balgit....


shashaank

हा शेवट कसा वाटतो आता..... आवडला तर जरुर सांगा....

केदार मेहेंदळे