अंतरंग

Started by स्वप्नील वायचळ, January 31, 2012, 03:45:56 PM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

                 अंतरंग

कुणास वाटे गाणे गावे कुणा मनी हो मोर नाचे

दैव आपुले आपुनि घडावे नको ते समाज साचे
कुणी असे खेळात प्रवीण कुणी असे कलाकार
सुंदर ते कैलाश लेणे धन्य ते शिल्पकार 

केल्याविना कळत नसते करून पहावा यत्न

केल्याविना वळत नसते राहील फक्त स्वप्न
स्वप्नांना साकार करावे अशी बाळगा जिद्द
जननिंदेची तमा न करता करा स्वतःला सिद्ध

स्वच्छंद जगा रे उंच उडा द्या सुप्त गुणांना वाव

बाह्यरुपाचा अंतराशी नको तो लपंडाव
स्वच्छ मनाने नव्या दमाने करा जीवनारंभ
आयुष्यातील एकेक दिवस असेल समारंभ

                                 -स्वप्नील वायचळ

केदार मेहेंदळे



raghav.shastri

छान कविता...

केल्याविना कळत नसते, करून पहावा यत्न
,
केल्याविना वळत नसते, राहील फक्त स्वप्न....

स्वच्छ मनाने, नव्या दमाने करा जीवनारंभ,
आयुष्यातील एकेक दिवस असेल समारंभ....



अविनाश साठे

Khup chan leehilee hi kavita.


snehal mahadu jadhav

               

कुणास वाटे गाणे गावे कुणा मनी हो मोर नाचे
दैव आपुले आपुनि घडावे नको ते समाज साचे
कुणी असे खेळात प्रवीण कुणी असे कलाकार
सुंदर ते कैलाश लेणे धन्य ते शिल्पकार 

केल्याविना कळत नसते करून पहावा यत्न
केल्याविना वळत नसते राहील फक्त स्वप्न
स्वप्नांना साकार करावे अशी बाळगा जिद्द
जननिंदेची तमा न करता करा स्वतःला सिद्ध

स्वच्छंद जगा रे उंच उडा द्या सुप्त गुणांना वाव
बाह्यरुपाचा अंतराशी नको तो लपंडाव
स्वच्छ मनाने नव्या दमाने करा जीवनारंभ
आयुष्यातील एकेक दिवस असेल समारंभ



jyoti salunkhe