थोडस अस्वस्थ वाटतंय बाकी काही नाही.

Started by Prasad S.Joshi, January 31, 2012, 04:11:24 PM

Previous topic - Next topic

Prasad S.Joshi

थोडस अस्वस्थ वाटतंय बाकी काही नाही

कवीं म्हणले "सोने कि चिडिया", शेतकऱ्याची तर "काळी आई "
क्रांतिकारक म्हणाले " मां भारती च्या स्वातंत्र्याशिवाय " जगण्याला अर्थ नाही,
पण तिचे हाल बघून थोडस अस्वस्थ वाटतंय बाकी काही नाही.

भ्रष्टाचारी लचके तोडतायत, देशद्रोही लांगुलचालन करतायत ,
अस्सल गुंड खादीचा गणवेश वापरतायत, न्यायदेवतेच्या डोळ्यांना काळी पट्टी बांधतायत
यांना शिक्षा देणाराच कोणी नाही, थोडस अस्वस्थ वाटतंय बाकी काही नाही

देशभक्तांना लाठी अन अफजल गुरु , कसाबला बिर्याणीची पार्टी
काश्मीरला तोडण्याचा डाव अन शहिदांच्या जीवाला फक्त मेडलचा भाव
तुझी हि अवस्था ऐकायला कोणी तयार नाही, थोडस अस्वस्थ वाटतंय बाकी काही नाही

शेतीपेक्षा IPL मध्ये मजा आहे, इथे आता शेतकरी होणे हीच एक मोठी सजा आहे.
पदवीधर होऊनही हाताला काम नाही, जन्मलेल्या बालकाच्या पोटाला अन्न नाही
इथे जगण्यातच काही राम नाही, थोडस अस्वस्थ वाटतंय बाकी काही नाही.

जन्मणाऱ्या मुलीला म्हणतात तुझे इथे काम नाही, स्त्री च्या अब्रूला काडीचीही सुरक्षा नाही ,
बलात्कारी राक्षसाला फाशी द्यायला दोरच नाही, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा टाहो ऐकायला कोणी नाही.
हा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही, थोडस अस्वस्थ वाटतंय बाकी नाही

विसरलो आम्ही शिवरायाची तलवार, विसरलो आम्ही सावरकरांचे उदगार
विसरलो आम्ही भगतसिंगाचे बलिदान, जातींच्या भांडणात झालो आम्ही रममाण
हे बदलण्यासाठी कोणीच पुढे येत नाही, थोडस अस्वस्थ वाटतंय बाकी काही नाही.

अजूनही एक आशेचा किरण दिसतोय, भयाण अंधारातही उष:कालची चाहूल कुणीतरी देतोय, आम्हाला लढण्याची प्रेरणा देतोय, राष्ट्रधर्माची आठवण कुणीतरी करून देतोय, लढाईच्या वेळी शौर्य गाजवण्याची संधी जाणार तर नाही , म्हणूनच माते थोडस अस्वस्थ वाटतंय बाकी काही नाही.
वंदे मातरम........



santoshi.world

nice ... is it ur own poem or just a copy paste? khali kaviche nav nahi mhanun vicharatey ..........


MK ADMIN


@Santosh Dhanyvad
Malach suchli



mag post edit karun kavite khali appla naav taka...