स्वार्थी प्रेम

Started by kalpana shinde, February 01, 2012, 03:50:57 PM

Previous topic - Next topic

kalpana shinde

जेव्हा माझ्या नसानसात
तुझे प्रेम भिनले होते
तेव्हाच माझ्या जीवनात
नशिबाचे वारे उलटे फिरले होते

प्रेम केले होते तुझ्यावर
खूप खूप मना पासून
मला काय माहित एक दिवस
तोडेल ते मला आपल्या माणसांपासून

तुझे प्रेम मला समजले नाही
हीच मनात एक खंत आहे
प्रेम नवता तर स्वार्थ आहे
समजून मी आज शांत आहे

तुला हवे होते माझे stetus
माझा पैसा माझी मेहनत
कारण संकटाशी लढ्याची
नव्हती तुझ्यात हिम्मत

लग्न म्हणजे खेळ नसतो
हे तुलाहि माहित होते
तरीही झुगार खेळलास तू
कारण मला तुला हरवायचे होते

कश्याला राहू मी तुझ्या
खोट्या या बंधनात
लढेल मी स्वतहा एकटी
गरज नाही तुझी माझ्या जीवनात

प्रेम तर सर्वच करतात
चुका पण सर्वान कडून होतात
पण तुझ्या चुकांवर पांघरून
घालणे नाही माझ्या हातात

प्रेमात सर्व माफ असते
असे मी ऐकले होते
पण तुला माफ करणे
हे माझ्या मनाला  पटत नव्हते

तू तुझा सुखी रहा
मी माझी सुखी राहीन
आता या जगाला मी
माझ्या डोळ्याने पाहीन

कल्पना शिंदे (मोना)-०१.०२.२०१२


yogesh khairkar

kalpana tai kharach khup chhan kavita keli..... mala majhya jeevanatale kahi kshan aatavale...


manoj vaichale

जेव्हा माझ्या नसानसात
तुझे प्रेम भिनले होते
तेव्हाच माझ्या जीवनात
नशिबाचे वारे उलटे फिरले होते

केदार मेहेंदळे


MK ADMIN

#5


कश्याला राहू मी तुझ्या
खोट्या या बंधनात
लढेल मी स्वतहा एकटी
गरज नाही तुझी माझ्या जीवनात

Prematla swarthi bhav khup chan prastut kela ahe....

santoshi.world

apratim ....... mala khup khup khup avadali kavita ......... keep writing n keep posting :)

kalpana shinde

thnks frnds ek chotasa praytna hota majha pan tumhala awadla tya badal dhanywaad

MG

प्रेम तर सर्वच करतात
चुका पण सर्वान कडून होतात
पण तुझ्या चुकांवर पांघरून
घालणे नाही माझ्या हातात
.
He asach astat nehmi mulinich saglya chukanvar panghrun ka ghalaav? ka tyana bhavnaa nastat ka?