वाळूचं घर

Started by टिंग्याची आई..., February 01, 2012, 05:08:50 PM

Previous topic - Next topic

टिंग्याची आई...

समुद्र किनारी वाळूत बांधलेलं एक छोटंसं घर...
घर कसलं जणू छोटीशी गुहाच ..
छोटंसंच होतं पण स्वप्नांनी गच्च भरलेलं...
"त्या" दोघांनी स्वतःच्या हातानी बांधलेलं....हसत खेळत... गप्पा मारत..
एकमेकांच्या हाताला नकळत स्पर्श करत......

वाळूच्या प्रत्येक ओंजळीबरोबर एक एक स्वप्नं बघायचं...
दोघांच्या प्रेमाचा त्याला आधार द्यायचा...
विश्वासाच्या हळुवार हाताने पाया भक्कम करायचा....

घराच्या दारासाठी रोवलेला पाय तिचा... लवकर निघावा म्हणून त्याने घाई करावी ..
पण तिला मात्र त्याच वाळूत त्याच्या प्रेमाची ऊब भासावी..
त्यानेही मग सुंदरसं घर बांधावं.. उगीचच तिला आवडलं का? विचारावं ...
तिनेही हसत हसत थोडं Correction सुचवावं...
आणि पुन्हा एकदा दोघांनी मिळून ते घर पूर्ण करावं...

मग वेळ येते रुतलेला पाय काढायची... दोघांचाही जीव त्यात गुंतलेला..
आणि पाय जणू समाजाच्या बंधनात रुतलेला...
सरळ नाही काढला तर सगळं घरच कोसळेल..
आणि तसाच राहू दिला तर आयुष्यच कठीण होऊन बसेल....

हळू हळू मग दोघेही तो पाय बाजूला काढतात...
तो वाळूने भरलेला तिचा पाय साफ करत असतो...
आणि तिचे डोळे मात्र ते घर न्याहाळत असतात..
तासान-तास मग दोघांनी ते घर पापण्यात साठवावं...
निघतानाही पुन्हा पुन्हा मागे वळून पहावं...

दोघे निघून गेले पण वाळूचं घर मात्र तसंच उभं आहे ..
त्यांच्या स्वप्नांना आसरा देत...
मग रात्रीच्या वेळी चांदण्यांनी अंगणात मोहक सडा घालावा..
चंद्रानेही आपल्या दुधाळ प्रकाशाने न्हाऊ घालावं ...
अगदी राजवाड्याच्या दिमाखात किनार्यावर उभं रहावं...
समोरच्या विशाल सागरावर.. आपलं साम्राज्य गाजवावं...
आणि भरतीच्या वेळी मात्र समुद्रानेच...
त्या घराचं अस्तित्व आपल्या पोटात सामावून  घ्यावं...

एखाद्या मोठ्या लाटेबरोबर ते काठावरच्या वाळूत कुठेतरी हरवून जातं...
आणि दुसर्या दिवशी पुन्हा एकदा कालच्याच स्वप्नांना घेऊन कोणीतरी नव्याने उभं करतं......
"त्या" दोघांच्या प्रेमाचं प्रतीक.. ते एक "वाळूचं घर"......


- शैलजा 

MK ADMIN

Krupaya topic Marathi madhye post karave... it will be automatically deleted in next 24 hours.

Marathi Typing : http://marathikavita.co.in/index.php/topic,2234.0.html

santoshi.world

nice poem ....... post marathit edit karun dili ahe ... please take care next time to post only in marathi font... :)

MK ADMIN

thanks a lot...topic wont be deleted now.
@shailja : Krupaya sahakarya karave :)

शैलजा

Dhanyavaad..... Santoshi...  :)
chaan vatla.. achanak kavita marathit kashi kay aali ..... surprised....  ;D