कविता चोरण आहे का सोप ......?

Started by विवेक राजहंस..., February 01, 2012, 05:47:14 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

कविता चोरण आहे का सोप ......?

दुसऱ्याची कविता चोरण , खरच आहे का हो सोप ....?
जणू ताकाला देतात फोडणी , इतक ते सहज होत....

नसलेल्याचा भाव आणायचं , करायचं होत्याच...नव्हत ..
मग नंतर पेटतात धीन्डोरे, जणू सगळं ते माझाच होत..

लिहिणारा लिहितो मनाने , करून दिवसाची रात्र...
षड्न्च्या हाती जात मग, काव्याची हि रास...

शब्दालाही बदलतात असे , जणू बदलतात आपल पक्ष...
सत्तेसाठी काहीही करायचे....??? आणि वापरायचे आपले नसलेले डोके...

ठेवायचे कवितेचे रुदय , दवाखान्याच्या माजघरात ...
करुनी त्याचीच सर्जरी...., मिरवायचे प्रत्येक मनाच्या  घरा घरात ....

कसली हि चोरी .....कसली हि चेष्टा.....!!!!!!
इथेच नेहमी होते , खऱ्या कवीची कुचेष्टा..........

एवढं सगळ करून.....,
काव्यांची गाठ मारून ......,
काव्यानं ठेवायचे पाळण्यात अलगद , स्वताच द्यायचे झोके......

आता तुम्हीच सांगा माझ्या मित्रानो .......
दुसऱ्याची कविता चोरण , खरच आहे का हो सोप ....?


विवेक राजहंस, पुणे 
९७६२०१८८३५