मी किनै आई....

Started by shashaank, February 02, 2012, 12:54:11 PM

Previous topic - Next topic

shashaank


मी किनै आई....

मी किनै आई.... होणारे ड्रायव्हर...
झूSSSम... गाडीतून जाऊ दूर दूरवर....

मी किनै आई... होणारे पायलट..
सुंSSSई... प्लेनमधून दोघेच जाऊ सटासट...

मी किनै आई.... होणारे डॉक्टर..
घाबरु नको काही, जेम्स देईन बाटलीभर....

मी किनै आई... होणारे टीचर..
फोरचेच टेबल विचारेन फारतर...

मी किनै आई.... होणारे शेफ...
पिझ्झा बर्गर काही नको पोहे, उपमा सेफ ?

मी किनै आई..... होणारे डान्सर....
ह्रतिक, ऐश, करीना कसले येतील स्टेजवर...

टीचर, डॉक्टर, पायलट, डान्सर असलो / असले जरी ड्रायव्हर
झोपताना कुशीत मात्र तुझा /तुझी च गं बिलंदर...

- शशांक पुरंदरे.

केदार मेहेंदळे


shashaank

मनापासून धन्यवाद केदार - माझ्या सर्व कवितांना नावाजल्याबद्दल.......

पुजा


sweetsunita66


vijaya kelkar

     ____/\____
नमस्कार ,कवितेवर काय लिहू? छानच.आम्हा सारख्यास
प्रेरणा देणाऱ्या .


shashaank