ओझं

Started by ♥♪ अनुराग ♪, February 02, 2012, 09:46:04 PM

Previous topic - Next topic

♥♪ अनुराग ♪

आता सहन होत नाही हे श्वासाचं ओझ
झाल विश्वासघाताच  हे जीवन सारं
संपवितो कुढत, रडत प्रत्येक क्षण
आता उरलं नाही काही माझ्यातच माझं
आता सहन होत नाही हे श्वासाचं ओझं

केली आयुष्याची राखरांगोळी सारी
देहाच मंदिर ही केव्हाच बाटवलं
आलो कुठून चाललो कुठे
याचे पर्वा ना मला भान
आता उरलं नाही काही माझ्यातच माझं
आता सहन होत नाही हे श्वासाचं ओझं

आला दिवस गेला दिवस
केली अगणित पापं
आता तर दोरीही वाटायला लागली साप
उगवता सूर्य ही घेवून येतो
माझ्यासाठी अंधार काळाकुट्ट

आता उरलं नाही काही माझ्यातच माझं
आता सहन होत नाही हे श्वासाचं ओझं

भरवून हि पापाचा घडा
अजून मन भरला नाही माझं
पाहून माझं जिवंत प्रेत
स्मशानातली थडगी ही
पाळायला लागली शिवाशिव   
पेलावता पेलावता मला भूयीलाही झाला भार
थांबवून परिवलन एकदा म्हणाली
आता नाही रे सहन होत हे तुझ ओझं

                       
                                        ...अनुराग
                                     shabdmuke.blogspot.in