प्रेम - बायोकेमेस्ट्री

Started by shashaank, February 03, 2012, 03:29:35 PM

Previous topic - Next topic

shashaank

प्रेम - बायोकेमेस्ट्री

तिनं त्याला पाहिलं
त्यानं तिला पाहिलं
दोघांचंच मग वेगळं जग उभं राहिलं

दोघांच्याही घरी वादळ
वाक्य अगदी नेहेमीचंच
"प्रेम ना !...... प्रेम आंधळं असायचंच !"

"इतक्या चांगल्या मुली पडल्यात
काय मोठं दिसलं हिच्यात ?"

"ना पैसा, ना करिअर
काय पाह्यलं एव्हढं त्याच्यात ?"

"असली कसली ही थेरं
नुसता आहे उथळपणा !
जरा कुठे शिंगे फुटली
सगळा मेला चावटपणा !"

घरोघरी संवाद तेच
शब्द थोडे इकडे तिकडे
"आमच्यावेळेस नव्हते बाई
असले प्रेमा-बिमाचे लफडे"

जर्रा थोडं किस्सींग, हगिंग
लगेच टोमणे..... प्रेम-चाळे
लक्षात कसे घेत नाहीत
"हार्मोन्स"चेच प्रताप सगळे
"हार्मोन्स"चेच प्रताप सगळे..
......

- शशांक पुरंदरे.

santoshi.world

#1
he patale ekdam ........... :D ;D 

जर्रा थोडं किस्सींग, हगिंग
लगेच टोमणे..... प्रेम-चाळे
लक्षात कसे घेत नाहीत
"हार्मोन्स"चेच प्रताप सगळे ..........   ;)