एका नेत्याची प्रेमकविता........

Started by विवेक राजहंस..., February 03, 2012, 08:22:59 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

एका नेत्याची प्रेमकविता........


तू विरोधी पक्ष होतेस तेव्हा,
तुझा राग मिरचीसारखा आसतो...

तू बिलागतेस अंगाला तेव्हा,
तुझा स्पर्श खुर्चीसारखा असतो..

मी सामान्य कार्यकर्ता होईन..
तू हायकमांड होशील का...??

सरकार अपक्षांना देते,
तेवढे डिमांड देशील का....??

तुझा माझा संयुक्त जाहीरनामा
मी आघाडी प्रमाणे जपत आहे

माझ्याशी बंडखोरी करशील तर
तुला लोकशाहीची शपथ आहे.......

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५

santoshi.world