कविता, कविता....

Started by shashaank, February 04, 2012, 01:53:49 PM

Previous topic - Next topic

shashaank




प्रेम, प्यार, दिल घोकून प्रेम होत नाही
प्रेमवीर झाले कितीही मजनू जन्मत नाही

फुले, पाखरे, नद्या आणून कविता होत नाही
उपमा खूप देल्या तरी कालिदास होत नाही

जोडीने फिरुन खूप प्रेम होत नाही
हात हातात घेऊनही हृदये जुळत नाही

एक साधे फुल फुलते काव्य उमलून येते
निरागस बालहास्यातून काव्य बहरुन येते

भीक नको भिकार्‍याला, दोन गोड शब्दांची तहान
पाय तरी कधी चेपलेस का, नुसतेच म्हणे आई महान

नाजुक, सुंदर, हळवे शब्द फुसके होतील का कधी कविता
सुख दुसर्‍याला देता देता अनुभवशील खरी कविता

-शशांक पुरंदरे.

केदार मेहेंदळे



shashaank

Kedar, Shailajaa - manaapaasoon dhanyavaad.

Aparna Viranak


shashaank

aparna - tuzee comment kalalee naahee....