मॉडर्न कविच्या व्यथा.....

Started by shashaank, February 04, 2012, 03:26:26 PM

Previous topic - Next topic

shashaank

मॉडर्न कविच्या व्यथा.....

फुटके तुटके शब्द आणून कविता केल्या चार
दोस्त सगळे चाट पडले, कसलं भारी यार

मितालीला विचारतो मग, काय आणू सांग ?
चंद्र-तारे आणून देतो, नाऊ व्हॉट्स राँग ?

गाल फुगवून म्हणते कशी कसले चंद्र-तारे
एक कोल्ड कॉफी कुठून तरी आणून दे ना रे

सगळ्या पोरी सारख्याच, यांना कळेल का कविमन ?
खायला प्यायला द्या नुसते, वर प्रेझेंट ए वन !!!

कुठून पडलो फालतू सालं, फंदात या कवितांच्या ?
डॅडकडे मागू कसा पॉकेटमनी जास्तीचा !!!!

- शशांक पुरंदरे.

केदार मेहेंदळे



shashaank

dhanyavaad.....