माझी कविता

Started by sulabhasabnis@gmail.com, February 04, 2012, 07:17:10 PM

Previous topic - Next topic

sulabhasabnis@gmail.com

माझी कविता
तो म्हणाला तुझी कविता
झाली  आहे औटडेटेड
कविता करण्याचं तू
सोडून दे हे वेड-----
"म्हणजे काय?"
-असे विचारता
हसला पाठीवरती हात ठेवून   
  तो बोलू लागला ,
-अजून तुझ्या कवितेत
    आहेत चिऊ-काऊ
हळुवार मनाचा तू
फारच करतोस बाऊ
प्राजक्त-मोगऱ्याचा
घेत बसलास गंध
कविता गेली किती पुढे ,
तुला नाही रे गंध
त्याच त्या प्रतिमांची
गुंफित बसलास वेणी
अजून तुझ्या कवितेतून
गेली नाही राणी!
किती दिवस बसशील
असे लिहीत गुळमुळीत
दाखव लिहून काहीतरी
दाहक व जळजळीत
कर तू पुन्हा क्रांती
ये तलवार परजीत
पेटू दे समाज हा
रक्त घेऊन ओंजळीत         

अहो,
आयुष्यात कोणासंगे
नव्हती घेतली मी  टक्कर     
  रक्त वगैरे म्हणताच
मला आली चक्कर
-चक्कर येऊन पडताच
मला आली ग्लानी
स्वप्नात तीच राणी
घेऊन आली पाणी
मला समजावत तिने
  पुसलं डोळ्यातल पाणी
डोक्यावरून हात फिरवत   
  समजावू लागली राणी
-बाळाला हसवताना
तलवार काय कामाची
चिऊ-काउची गाणीच
असतात तेव्हा म्हणायची
प्रेम-बीम करताना
रक्त नसत माळायच
मोगऱ्याच्यागजऱ्यात
मन असत गुंफायच
चंद्र -चांदण्याचं आकाश
कधीच नाही मावळणार
त्यांच्याशिवाय आसवांना
कोण आधार देणार
करायची नसते बाबा
सर्वांनीच क्रांती-बिंती
कुणीतरी व्हायचं असत
हळुवार मनाच सोबती
तुझ्यासारख तू लिही
म्हणोत कुणी काही
तुझजगण कर सुंदर
तेच सर्व काही !                 
                     - नरेश महाजन                     
                                साप्ताहिक सकाळ -दिवाळी-२०११       


sulabhasabnis@gmail.com


केदार मेहेंदळे