मुक्तातमा (गमन)

Started by केदार मेहेंदळे, February 06, 2012, 01:00:41 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 
(माझ्या 'गमन' ह्या संग्रहात मी मृत्यू, मुक्ती, पुनरजन्म, इ बद्दलच्या आपल्या कल्पना जरा वरखाली करायचा प्रयत्न केला आहे.   
मृत्यू नंतर श्राद्धाला खरच तो आत्मा तेथे येत असेल का? ह्या विषयावर हि कविता आहे. )

जमली गर्दी घाटावर
मांडले पिंड पानावर
लगबग गुरुजींची चालली
पूर्ण करण्या विधी श्राद्ध

पत्नी मुले आप्तेष्ट
मित्र मंडळी स्वकीय
काढती आठवण त्याची
गाळती टिपे डोळ्यातून

नका करू काळजी
पत्नी अन मुलांची
असे म्हणुनी ठेविला
पिंड पानावर आणुनी

पाहून भात पानावर
उडती कावळे आसपास
उचलण्या येऊन त्वरित
सर्व करती कावकाव

जरी होता तोही तिथेच
देह बंधाच्या पल्याड
परी जमलेल्या गर्दीत
ना तो ओळखे कोणास

वावरत होता आसपास
न समजता याचे प्रयोजन
तो मुक्तातमा तिथेच परी
ना दिसे तो  कुणास

पाहुनी भात चाळवली  त्याची
वासना अगम्य पूर्व जन्मीची
जाणवली भूक अनोळखी
नलागे अर्थ त्यासी

घेऊन काक रुपास
मारली चोच पिंडावर
त्याच क्षणी तुटला त्याचा
अखेरचा येथला ऋणानुबंध

स्पर्शता पिंडाला कावळा
म्हणती चला झाला मुक्त
निघून गेले आनंदाने सर्व
सोडून तेथेची त्यास

घोटाळून तेथेची जरा
गेला  उचलण्या  भात परत
तोची उमजले त्यास
निघायचे पुढील प्रवासास



केदार...
माझ्या 'गमन' ह्या संग्रहातून

प्रारब्ध (गमन)

http://marathikavita.co.in/index.php/topic,7604.msg24217.html#msg24217

वैराग्याचा मेळा (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,7331.msg23298.html#msg23298