अजून त्याची नाही चाहूल

Started by shashaank, February 08, 2012, 09:36:53 AM

Previous topic - Next topic

shashaank


अजून त्याची नाही चाहूल.....

रेखून बसले मेंदी हातावर
नजर सततचि ती मार्गावर
मनातले जळ डुचमळ डुचमळ
अजून त्याची नाही चाहूल

नको नको त्या कोकिलताना
काग आज तरी सांगे शकूना
सूकून गेले गाली ओघळ
अजून त्याची नाही चाहूल

दर्पणी बघता तूचि तिथे रे
मिटता नयनी तू दिसशी रे
कशी ही वंचना होते व्याकूळ
अजून त्याची नाही चाहूल

समोर जेव्हा येशील सखया
विरघळेन मी मिठीत तुझिया
स्वप्न मनी ना राहो केवळ
अजून त्याची नाही चाहूल...


-शशांक पुरंदरे.

केदार मेहेंदळे

khrokhar khup chan kavita.... kavitechi shabd rachanach ashi aahe ki ti talat mhntli jate. ekhadi chan chal lavli tar khup chan gan hoil.


shashaank






deeepaalee


shashaank

सर्वांचे मनापासून आभार....., असाच लोभ असू द्यात......