लय–प्रवास ||

Started by dinesh.belsare, January 06, 2026, 12:24:29 PM

Previous topic - Next topic

dinesh.belsare

अजिंक्य वाटणारा पर्वत गळेल,
आफाट वाटणारा समुद्र सरेल |
गळतील भले मोठे वृक्षही सारे,
रुद्ररूप धरा एकदिन विरघळेल ||
 
जल गिळेल धरेला आपुल्या कवेत,
अग्नी जाळील सर्व रूप-रंग तेथ |
वायू वाहून नेईल अग्निकण सारे,
आकाश सामावेल अग्निला शेवटी ||
 
गंध, रस, रूप लय पावतील सारे,
स्पर्श, शब्द होतील आकाशात विलीन |
स्थूलातून सूक्ष्माकडे प्रवास हा,
उरेल साक्षी—निशब्द, निर्वर्ण, शुद्ध ||
 
कळाले जरि हे क्षणोक्षणी,
वळणार नाही मीपणी।
मी गळेल, माझे गळेल,
राहो सदा ध्यानी-मनी॥