बाळासाठी.......

Started by shashaank, February 08, 2012, 09:42:15 AM

Previous topic - Next topic

shashaank



बाळासाठी.......

एक दाणा चिऊसाठी
एक घरटे काऊसाठी

एक घास हम्मासाठी
एक वाटी माऊसाठी

एक बिस्किट भू भू साठी
एक अंगाई चांदोबासाठी

एक गाणे बाळासाठी
गोड गोड पापीसाठी

-   पुरंदरे शशांक.

केदार मेहेंदळे


shashaank