कविता एक शाळेसाठी

Started by vishakha beke, February 08, 2012, 01:15:47 PM

Previous topic - Next topic

vishakha beke

कविता एक शाळेसाठी

दहा वर्षे होती आनंदाची
दहा वर्षे होती सुखाची
दहा वर्षे होती शिक्षणाची
दहा वर्षे होती शाळेच्या छायेत रमण्याची

कधी संपली दहा वर्षे हि
लक्षातच आले नाही
आत्ताच शाळेत आलो आहोत
सतत असेच वाटत राही

आई प्रमाणे केले प्रेम तुम्ही
बाबां प्रमाणे रागावलात ही
आई - बाबांच्या सहवासाचा विसर
नाही पडू दिलात तुम्ही

पहिले पाउल पडताच शाळेत
तुम्ही आमचा हात धरला
सगळ्या प्रकारचे शिक्षण देऊ
असा विश्वास घरच्यांना दिला

दिलेला विश्वास पाळलात तुम्ही
पण आम्हाला तो कळला नाही
कधी पडलो , भरकटलो , चुकलो आम्ही
पण तुम्ही हात सोडला नाही

सतत केला वर्षाव उत्कृष्ट संस्कारांचा
मार्ग दाखवला जीवनाचा
कधी डगमगू नये आम्ही म्हणून
बळकट केला आत्मविश्वास आमचा

आमच्या सप्तरंगी आयुष्यात
एक रंग असेल या शाळेचा
ह्या रंगाला कसे खुलवतो त्याचा
क्षण आला आहे स्वतःला तपासण्याचा

घेऊन तुमचा आशीर्वाद बरोबर
पुढचे पाउल टाकतो आहे
विसरणार नाही कधी
तुम्हाला आणि या शाळेला
हे आश्वासन देतो आहे

आली वेळ दूर जाण्याची
पण ... जाव्वत नाही आता
संपली दहा वर्षे ही
पण ... खरे वाटत नाही आत्ता   

संपली दहा वर्षे ही
पण ... खरे वाटत नाही आत्ता 
------- विशाखा बेके ------

केदार मेहेंदळे