नेमके सत्य

Started by शिवाजी सांगळे, January 08, 2026, 08:14:54 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नेमके सत्य

धडधडणे असे तुझ्या काळजाचे कळेना
आकर्षण आर्ततेतले की गूढतेचे कळेना

पंचतत्वात विरघळतो देह, म्हणतात जेष्ठ
परिणाम हे वर्तणुकीचे की ग्रहांचे कळेना

आहार,निद्रा,भय,मैथुन मापदंड जगण्या
खरे वर्चस्व नैतिकतेचे की धर्माचे कळेना

काळानुसार उमटलेले ओरखडे मनावरचे
दिलेले तुझे? की आहेत, स्वतःचे कळेना

अनादी ओढ शिवास सृष्टी न् अतर्क्याची   
नेमके सत्य, उजेड अन् अंधाराचे कळेना

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९