आईला आपण स्वीकारणार का

Started by sanajy pande, February 09, 2012, 12:38:54 AM

Previous topic - Next topic

sanajy pande

आई ही आईच असते
तिची सर् कोणालाच नसते
मुलाच्या हारण्यात ही साथ देते ती
आई
मुलाच्या पडण्यातही शिकवते ती
आई
स्वतः चे पोट रिते ठेऊन मुलाला भरविते ती
आई
मुलाच्या चुका स्वताच्या पदरात घेते ती
आई
मुलाच्या बापासमोर बाजू मांडते ती
आई
मुलाच्या सुखासाठी जगाशी दुश्मनी घेते ती
आई
अशी ही निर्व्याज प्रेमाची मूर्तिमंत प्रतिमा म्हणजेच
आई
आजकालचे वृद्धाश्रम बघून खरोखर डोळे पाणावतात
अश्या मुलांना ही या आया का माफ करतात
आता तरी आमचे डोळे उघडणार का
आईला आपण स्वीकारणार का
आईला आपण स्वीकारणार का
sanjay pande, nagpur