वाघाची मावशी....(संस्कारीत)

Started by shashaank, February 09, 2012, 08:45:48 AM

Previous topic - Next topic

shashaank

वाघाची मावशी....

वाघाची मावशी मनीमाऊ छोटीशी
सिप सिप करताच उडी मारी इवलीशी

शांपूबिंपू काही नको तरी किती छान
चाटत बसते स्वतःला आवडेना घाण

म्याँव म्याँव करत घोटाळते पायात
लाड करुन घेते मावशी ही तोर्‍यात

टॉमी समोर येताच गुरकते केवढी
केस फुलवून म्हणते मी तर तुझ्याएवढी...

- पुरंदरे शशांक.

केदार मेहेंदळे





puravatri