आठवण........

Started by विवेक राजहंस..., February 09, 2012, 04:18:31 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

आठवण........

तुही नाही ....मीही नाही
राहिलेच काही नाही ,
आठवणीचे ठसे असेच उमटून गेले ,
भूतकाळात सारे असेच घडून गेले......

राग होते, रुसणे होते ,
सारे काही फसवेच होते ..
माझ्या या फजितीवर
सारेचं जण हसले होते....

भविष्य काळातील स्वप्ने सारी
उधवस्त होत चालली आहेत
एकामागून एक अस विचित्र घडत आहे...

कधी अस झाल तर
स्वताला  मीच सावरत असतो ,
आपल्याबरोबर कुणीच नाही ,
म्हणून मन हि रडत असतं......

अश्रूही थांबत नाहीत
ते आपली वाट मोकळी करतात ,
स्वताचेच दु:ख ते माझ्या डोळ्यातून सांडतात ,
एवढं मात्र खर आहे......
ते फक्त तुझीच आठवण काढतात.....

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५


bhanudas waskar


bhanudas waskar

एवढं मात्र खर आहे......
ते फक्त तुझीच आठवण काढतात.....

हे खुपच सुंदर आहे

****भानुदास****

विवेक राजहंस...

Thankssssssss.....Bhanudas


vivek


विवेक राजहंस...


king0143