माऊले, तूच त्यांचा आधार........

Started by amitunde, February 10, 2012, 08:12:31 PM

Previous topic - Next topic

amitunde

अनाथांची माय...सिंधुताई सपकाळ....

चिमुकल्या जीवांची, आहेस तू माउली
पदराखाली दिलीस, आभाळागत सावली
निरागस त्या मनाला, दिलास तू आकार
माऊले, तूच त्यांचा आधार........

कोणाचे पाप मारिले, या चिमण्यांच्या माथी
चूक नसताना काही, भोग आले नशिबी
संघर्षाच्या प्रेरणेची, आहेस तू शिल्पकार
माऊले, तूच त्यांचा आधार........

चिखलात रुतलेले, कमळ तू फुलवलेस
दारिद्र्याचे वणव्याचे, निखारे तू विझवलेस
मरणांती वेदानावारती, घातलीस तू फुंकर
माऊले, तूच त्यांचा आधार........

अनाथांना प्रेम दिलेस, जगण्याचे बळ दिलेस
निराश त्या पाखरांना, भरारीचे पंख दिलेस
असंख्य चटके सोसुनी, दूर केलास अंधकार
माऊले, तूच त्यांचा आधार........

अमित सतीश उंडे...