मी मराठीच.....

Started by विवेक राजहंस..., February 11, 2012, 02:26:52 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

मी मराठीच.....


संस्कार आणि नियमबद्ध दुनियेत ..जगतो आहोत आम्ही ,
मराठीचाच बाणा जपणार..जिवंत असेपारीयंत आम्ही.....

मराठी भाषाच विसरली अनेकजण आज,
इंग्रजी फक्त  बोलून बोलून जड झाली जीभ आज....

गावठी शब्द , शब्दाचे अनर्थ ..म्हणणारे आहेत दुनियेत काही,
कसलीही दुनिया ...? कसलीही माणसे ...?
ज्यांना मराठी भाषेचे गूढच कळले नाही......

भाषेचा हा दोष नाही.. माणूसच बनला कठपुतली ,
पेशासाठी संस्कार सोडले ...
मराठीला तर Massage सारखे Delete  केले......

विखारलेली माणसे एकत्र बोलावतोय आम्ही,
आपलीच भाषा जपायचा...छोटासा प्रयत्न करतोय आम्ही.....

नाही कोणत्याच भाषेचा राग....नाही कोणाचीच दुष्मनी ,
आजही आहे मराठी....प्रत्येकाच्या  मनामनातुनी ...

एखादा वाचतो , आमलात आणतो ,
गहिवरून येते मन ,
No Sorry , No Thanku ...जड शब्दांनी मग का बदलता तुमच मन....

बोलायला शिकला लहानपणी ..आईच म्हणता पहिल्यक्षणी ,
का विसरता मग..या क्षणी ..
त्यांनाच बदलायचा प्रयत्न करतोय...आज मी असेन जोपर्यंत जिवंतपणी...

तुम्ही तुमचे....आम्ही आमचे ..,
जगतो आहे या दुनियेत ,
कसलाच गर्व नाही मराठीचा..पण भाग पाडतो विचार करायला..,
आमलात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला.......

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५

विवेक राजहंस...

HE...KAVTA ASHYA LOKANCHYASATHI AAHE...GE LOK MARATHI ASUN , MARATHICH BHASHECHA DEVESH KARAT..

केदार मेहेंदळे


विवेक राजहंस...