युती

Started by Mangesh Kocharekar, February 11, 2012, 09:26:49 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


        दर दोन पाच वर्षांनी निवडणुकीचा एल्गार
आठ्व्लेना चालतो  कुणाचाही शेजार
    त्यांच्या   भाषणाचे शब्द नित उमटत नाहीत
     निवडणूक जीकल्यास ते दिसतही नाहीत
निवडणुकीत धडपडले तर सहकाऱ्यास  देतात दोष
सहकारी पक्षास ओढून करीत सुटतात आरोप
     थकून भागून चार महिने घेतात शांत झोप
     त्यंच्याच दरी जावून गुंफतात मैत्रीचा गोफ
खासदार नाही निदान आमदार करा
प्रत्येकाच्य दरी लावतात नवे आशेचे रोप
     मित्र पक्ष काय त्यांना स्वकीय टाळतात
    बाबा साहेबांचे गणगोत वेगवेगळ दळतात
गवई ,ढसाळ,जगदाळे कितीतरी शाखा
प्रकाश आंबेडकरांचा सूरच अनोखा
   तरी आठवले युती करत उद्धवना धरतात
  आठवलेच्या दाढीचे खुंट त्यानाही टोचतात
नाईलाज म्हणून मुंडे तावडे सोबत असतात
तिकीट कापल्याच्या चर्चा नंतरच रंगतात
    सारे सोसत एकजुटीचे नाटक करतात
   दर पाच वर्षांनी तेच खलनायक ठरतात
                            मंगेश कोचरेकर       

     

MK ADMIN

khup ch chan Mangesh..  spot on. :)

neel_ihm

give it to voters.......... sabkuh hai isme ....... dalit chalvalichi vatahat nemkya shabdaat...... carry on....