नातं

Started by shashaank, February 13, 2012, 04:24:15 PM

Previous topic - Next topic

shashaank

नातं

रोज पाहते अवती भवती स्नेहाविण सुकलेली नाती
तेज कालचे ओसरलेल्या, काजळलेल्या उदास वाती
संवादांचीही चाकोरी.. तेच उसासे.. तोच उमाळा..
परस्परांची सवयच नुसती.. तिलाच म्हणती लळा जिव्हाळा
रोज टाळणे जबाबदा-या, रोज भांडणे हक्कासाठी
हार गळ्यातिल कुण्या काळचे जोखड झाले मानेभवती
हीच काय पूर्तता प्रीतिची? लोकमान्यता? विवाहबंधन?
गोंडस नावांखाली नुसते देहाचे सुख, पुनरुत्पादन

म्हणून सखया या सा-याहुन नाते सुंदर तुझे नि माझे
शिळेपणाचा शाप न याला.. बकुलफुलापरी सदैव ताजे
असो अनामिक सौह्रद अपुले, नसो तया उपमान जगी
विशुद्ध निर्मळ सदैव उत्कट केवळ ह्रदयाची सलगी
मोजमाप ना देवघेविचे, दुःख न जवळी नसण्याचे
आश्वासन मज असे पुरेसे केवळ त्याच्या असण्याचे..

- स्वाती आंबोळे.(www.paarijaat1.blogspot.com)

mahesh4812

"असो अनामिक सौह्रद अपुले, नसो तया उपमान जगी
विशुद्ध निर्मळ सदैव उत्कट केवळ ह्रदयाची सलगी
मोजमाप ना देवघेविचे, दुःख न जवळी नसण्याचे
आश्वासन मज असे पुरेसे केवळ त्याच्या असण्याचे"
atishay sundar :)

केदार मेहेंदळे


maithili panse

This is really something.

shashaank

THE GREAT SWATEE .....

मिलिंद कुंभारे


विक्रांत

जन विषयाचे किडे .त्यांची धाव बाह्याकडे ...........आठवले


sweetsunita66

शुद्ध प्रेमाची परिकल्पना !!वाह छान !! :) :)

vijaya kelkar

 '' शुध्द नि निर्मळ नातं . ''
    छान आहे कविता