प्रवासातील ती भेट (भाग १)

Started by Rushi.VilasRao, January 18, 2026, 08:31:46 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

तीझ्या सोबतची ती अचानक भेट आठवणीत माझ्या राहून गेली...
गुलाबी थंडीच्या त्या पहाटे तीझी पहिली नजर माझ्या मनात घर करून गेली...
तीझ्या काळ्याभोर केसांचा आंबाडा, मन माझं तीझ्यात गुंतवून गेला...
ती बोलताना माझ्या कानी पडणारा तीझा आवाज माझ्या हृदयावर अलगद फुंकर घालून गेला....

सफर आता चालू झाली...
वाट लांबची कापताना
तिला अचानक डुलकी लागली....
खिडकी कडे माझी नजर गेली
बाहेरचं विलोभनीय दृश्यही, फिकं वाटू लागलं होतं, खिडकीच्या काचेत, तीझं प्रतिबिंब उमटलं होतं...
काचेच्या त्या पार जाताना, निसर्ग वेगाने धावत होता,
पण तीझा तो शांत चेहरा, तिथेच जणू विसावत होता...

Writer:-rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @K.rushi_bhaijaan


कुडकुडणाऱ्या त्या थंडीत तिने माझी झोप उडवली....
बाहेरचे जग वेगाने मागे धावत होते,
अन ती मात्र शांत निद्रेत पडून होती...
त्या शांततेतही एक वेगळीच, ओढ मला जाणवत होती...
तीझी ती निरागस निद्रा, जग माझं थांबवत होती...

तीझ्या सोबत केलेला लांब पल्ल्याचा तो अविस्मरणीय प्रवास सुखकर मात्र होऊन गेला...
तीझ्या नकळत तीझ्या डोळ्यात पाहणे, तीझ्या नकळत तीला हसताना पाहणे यातच वेळ माझा निघून गेला...

Writer:-rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @K.rushi_bhaijaan