विरहदाह

Started by sulabhasabnis@gmail.com, February 13, 2012, 06:06:08 PM

Previous topic - Next topic

sulabhasabnis@gmail.com

               विरहदाह
अजून व्याकुळते मन इथेतिथे वावरताना
अजून जडावतो ऊर आठवणी जपताना
अजून ओलावतात पापण्या डोळे मिटताना
अजून होती तुझेच भास स्वप्नी -जागताना
आठवणींचे मोहोळ फुटते नकोनको म्हणताना
हुळहुळते डंख झोंबती कितीही फुंकर घालताना
तीक्ष्ण शब्दांचे बाण ओठ मिटून झेलताना
घेऊ कुणाचा आधार सखाच माझा नसताना
घेतली होतीस ना शपथ सात पावले चालताना
आठवलीस  का ती तरी साथ मध्येच सोडताना
साहते आहे विरहदाह तुझ्याशिवाय जगताना
आहे आता त्याचीच साथ उरली वाटचाल करताना ---                                           
                    -------------       

mahesh4812


Ashok Gosavi


केदार मेहेंदळे


sulabhasabnis@gmail.com

thanks mahesh,ashok & kedar-----!!