गर्भातील चिमुकलीचे काही अनुत्तरीत प्रश्न....

Started by amitunde, February 14, 2012, 01:21:05 PM

Previous topic - Next topic

amitunde

गर्भातील चिमुकलीचे काही अनुत्तरीत प्रश्न.....

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी,
प्रेमिकेसाठी घेतो प्रियकर, उंच उंच भरारी,
मग सांगा, ताईविना दादा अन मुलीविना पालक,
हि कहाणी नाही का अधुरी......... ??? ?

बाबांसाठी मुलगी असते स्वप्नातली परी,
लेकच हवी हा आग्रह कोणी न धरी,
जिवंत स्त्री गर्भाचा जन्मापूर्वी अंत करी,
मग सांगा, राक्षसच नांदतो ना यांच्या अंतरी......... ??? ?

जन्म घेतला जिच्या पदरी,
ती एक मुलगीच, हे हि तो विसरी,
वंशाचा दिवा हवा आहे दारी,
मग सांगा, फक्त एका मुलासाठी,
आणखी किती लेकी धाडणार देवाघरी........ ??? ?

मुलगी असते धनाची पेटी,
प्रकाश देणारी जीवन ज्योती,
मुलागीशिवाय समाजाची होईल का हो प्रगती,
मग सांगा, कधी मिटणार हि भेदभावाची दरी........ ??? ?

अमित सतीश उंडे           



santoshi.world