प्रेमाचा दिवस.... (१४ फेब्रुवारी )..........????????????

Started by विवेक राजहंस..., February 14, 2012, 09:00:39 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

प्रेमाचा दिवस.... (१४ फेब्रुवारी )..........????????????[/b]



प्रेम केलं तुझ्यावर..पहिली नाही कधी तारीख....,

आपल्याच प्रेमाच्या खटल्यात ..पडते प्रेमाच्या दिवसाचीच तारीख

१४ फेब्रुवारी म्हणतात त्याला..हीच म्हणे प्रेम व्यक्त करायची तारीख.............



तारीख आली..खंबीर उभा राहिलो, प्रेमाचाच दिवस म्हणून गुलाबाचे फुल घेउनी आलो ,

सगळीच आज व्यक्त  करतात , म्हणून तुझ्यासाठी नव्याने सज्ज झालो......



दिवसच ठरवला आज , प्रेम करा व्यक्त.....

तुझीच रोज आठवण काढतोय ...कोण ठरवायचे कोण आहे.. आपल्यामध्ये श्रेष्ट..

कुठल्या आठवणी विसरू तुझ्या, प्रेमाच्या या तारखेसाठी.....

दर्वेलीच पास झालेल्या ...पुन्हा या परीक्षेसाठी......



आपणच ठरवतो दिवस..., आपणच ठरवतो तारीख...

असलेलंच प्रेम पुन्हा व्यक्त करायचं आज....., का ते फक्त ...दुनियेच्या नजरेसाठी ...?



उगाचच मग हसायचे गालातल्या गालात ... लाल किवा पिवळ्या फुलालाच महत्व द्याचे

नाश्ता सेन्टरच्या भाड्याच्या गाळ्यात............



तोडलेल्या आईचे मन मुलगा जोडतोय १४ तारखेला....

का साजरा करताय  हा दिवस ...?

जन्मदात्या आईलाच विसरता प्रेमासाठी मग...,

काय करता या तारखेला...?



दिवसालाच डिमांड देताय दरवेळी...कधी विचार केलाय स्वताबद्दल....

करतंय का कोणी खरच विचार..तुमच्या या प्रेमाबद्दल.....



करा एकदा तरी विचार...., पडा या मृगजलातून बाहेर...

सगळेच दिवस हे सारखेच असतात...., का करता त्याच दिवशी आहेर..?



प्रत्येकाच्या मनात प्रेम हे असतच असत .....पण त्याला कुठतरी शोधावं लागत....

आणि हे शोधण्यासाठी ...कुठल्याच तारखेच , काहीच अस्तित्व नसतं.

काहीच अस्तित्व  नसतं.........



विवेक राजहंस,पुणे

९७६२०१८८३५ .






विवेक राजहंस...

प्रिय वाचक ,

आजच्या या प्रेमाच्या दिवशी .....लिहिलेल्या माझ्या  या कवितेमुळे

कुणाचेही मन जर दुखावले असेल तर....त्याबद्दल मी क्षमस्व आहे.....

जसे माझ्या मनाला वाटले ...तशे मी फक्त माझ्या कवितेतून व्यक्त केलेले आहे.....



विवेक राजहंस,पुणे

९७६२०१८८३५ .