तू नक्की हो म्हणशील !!

Started by naikamitfb, February 15, 2012, 11:22:31 AM

Previous topic - Next topic

naikamitfb

तू नक्की हो म्हणशील !!
कवी : श्री अमित अरविंद नाईक - कॅलिफोर्निया - अमेरिका


तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे , वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत आहे
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे , तुझ्या प्रेमात न पडणे खरच अशक्य आहे ?
मनी आणि स्वप्नी तुझेच चित्र रेखाटतो , गुलाबाच्या फुलाहून तुझा सहवास सुंदर वाटतो
चित्त माझं उडायला तूच कारणीभूत आहेस , तुझी चूक नाही कारण हे होणं साहजिक आहे
तुझा चेहरा काही करून नजरे आड जात नाही , रात्री झोपू आणि दिवसा चैन देत नाही
तुला माहित नाही पण हे तुझ्यावरचा प्रेम आहे , कारण तुला हे समजणं खूप कठीण आहे
गुलाबी कागदावर लिहू का रक्ताने उमटवून देऊ , प्रेम करतो तुझ्यावर हे कसे तुला सांगू ?
मला नाही म्हण्याला तुला एक सेकंद लागेल , पण मला त्यातून सावरायला हा जन्म कमी पडेल
माझी हीं अवस्था तू नक्की समजून घेशील , खात्री आहे की तू मला नक्की हो म्हणशील !