ही वाट आपली दोघांची

Started by bava1984, February 15, 2012, 02:20:18 PM

Previous topic - Next topic

bava1984

ही साथ आपली दोघांची
बरसात आपली दोघांची
या श्वासाला या स्पर्शाला
ही साथ आपली दोघांची

मीणमीणत्या संसाराची
ही वात आपली दोघांची
जगण्याच्या लढाई तील
ही मात आपली दोघांची

दुखाच्य पटला वरची
ही काट आपली दोघांची
या उजाड माळा वरची
ही वाट आपली दोघांची      --भूषण भुवड