मार्ग.....

Started by विवेक राजहंस..., February 15, 2012, 10:00:02 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...


मार्ग.....

चुकला मार्ग...तरीही चुकलो नाही श्रेय सारे....,
चुकल्या मार्गावर...सामील आहेत सर्व तारे..

चालतच राहिलो अखंड...चालायचेच आहे म्हणून ..,
गुंगीत या गतीच्या.....सारेच पंथ न्यारे.....

घाबरतात संकटाना....जे त्यालाच सहन करायचे..
शंडपणा सोडा ....अनुकूल होतील सर्व तारे..

गर्विष्ट पणाचा...मी फाडला नकाशा...,
विझले तितेच सारे...राहिले फक्त किनारे...

चुकला मार्ग तरीही.....क्षितीज एकच आहे...,
काहीच नाही मागे...सर्वच आहे न्यारे..


विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५

sann1jay

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व तारे

मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे

आशा तशी निराशा हे श्रेय सावधाचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे

- विंदा करंदीकर.