जरा सांभाळून...

Started by विवेक राजहंस..., February 15, 2012, 10:53:18 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

[u]जरा सांभाळून......[/u]



बोलताना जरा सांभाळून....
शब्दांना तलवारीसारखी धार असते..,

फरक फक्त एवढाच कि...,
तलवारीने मान...आणि शब्दांनी मन कापले जाते..

जरी तलवारीच्या जखमेतून रक्त ,
आणि शब्दांच्या जखमेतून अश्रू, येत असले तरी...
दोघांपासून होणारी वेदनाहि सारखीच असते....

म्हणून सांगतो ..
बोलताना जरा सांभाळून....
शब्दांना तलवारीसारखी धार असते..,

शब्दच माणसाला जोडतात ,आणि शब्दच त्यांना तोडतात..
हे शब्दच आहेत..कधी रामायण कधी महाभारत रचतात...

तुच्या एका शब्दावर माझे सर्वस्व अवलंबून आहे...
तुच्या एका शब्दावर हसणे काय , माझे रडणेही अवलंबून आहे...

म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून....
शब्दांना तलवारीसारखी धार असते..,

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५

केदार मेहेंदळे

#1
khup chan.... pan ithe prem kavitet havi ka?

विवेक राजहंस...

केदार सर ..., अगदी बरोबर आहे..तुमचं.कि ( हि कविता इथे हवी का...? )
सगळ्यात जास्त प्रेमयुवक हे.., प्रेम कविता  वाचतात...
हा...संदेश त्यांच्याकडे......प्रेम कवितेमधून जलद जाऊ शकतो...
आणि याचा अर्थ असा नाही कि...., कोणी प्रेमाचे  शब्दच वापरू नका....
प्रेमामध्ये होणारे काही Misunderstanding , किवा नकळत चुकीचे बोलून गेलेले..
यासाठी आहे 
     असे मला वाटते...


विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५

santoshi.world

@ vivek - zar saglech asa tumchyasarkha vichar karun aplya saglya kavita prem vibhagatach post karat rahile tar ethar vibhagana kahi arthch rahnar nahi na? .......... so please post your poem in right section .... :)

विवेक राजहंस...

okkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk..........

.s :)o :)r :)r :)y


vivek