एक थेंब आठवण घेऊन जा...

Started by अविनाश सु.शेगोकार, February 16, 2012, 05:29:05 PM

Previous topic - Next topic
एक थेंब आठवण घेऊन जा...

सोडून जातांना मला एकदा
परत विचारू करून पहा,
तेही नसेल जमत तर सोबत
एक थेंब आठवण घेऊन जा...

हृदय तर नाही मागत फक्त
थोडीशी मनात जागा देऊन पहा,
नसेल मनात जागातर सोबत
एक थेंब आठवण घेऊन जा...

हातात हात नको पण
हृदयाला साथ देऊन पहा,
नसेल जमत साथ तर सोबत
एक थेंब आठवण घेऊन जा...

कधी तुला काही मागितले नाही
फक्त एक वचन देऊन पहा,
साथ माझी नाही मिळाली जरी सोबत
एक थेंब आठवण घेऊन जा...

कधी कोठे चुकलो असेल तर
मोठ्या मनाने माफ करून पहा,
आठवणी जरी माझ्या सागरासम
एक थेंब आठवण घेऊन जा...
: अविनाश सु.शेगोकार
१३-०२-२०१२


केदार मेहेंदळे