या गर्दीत माणसांच्या.....!!!

Started by avinash.dhabale, February 16, 2012, 07:18:56 PM

Previous topic - Next topic

avinash.dhabale

या गर्दीत माणसांच्या,
मी जणू कान वाळूचा,
जरी काठीर हि भाषा,
सत्य असे....!!

या गर्दीत माणसांच्या मी जणू थेंब सागराचा,
मजपाशी सागर हा,
तरी मन
एकटेसे......!!!!

या गर्दीत माणसांच्या
मी वाट विसरलेला,
भरकटलेला भ्यायलेला
जणू दिवा विझलेला....

या गर्दीत माणसांच्या
मी एकता स्तब्ध असा,
गगनावाचून पक्षी
अन पाण्यावाचून मासा जसा.......

या गर्दीत माणसांच्या
मी फक्त माझाच,
नसे पैज कुणाशी
तरी जगण्याचा हा अट्टहास कसा.....

आहेत प्रश्न अनेक
परी जाब एकही नसे,
या गर्दीत माणसांच्या
उत्तराविनाच जणू
सारे प्रश्न असे.....

या गर्दीत माणसांच्या....
या गर्दीत माणसांच्या.....!!!!!

--------------- अविनाश.

केदार मेहेंदळे