वेड मन......

Started by विवेक राजहंस..., February 20, 2012, 09:42:22 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

वेड मन......

बरेच दिवस विचारायचं होत..,
कधीतरी तो दिवस येईल ..याचीच वाट पाहत होतो...,
नेहमी फक्त तिचाच विचार ...,
स्वताशीच ठेऊन जागत होतो....,

कधी कधी वाटायचं
काही बोलायची गरज आहे का ..???
माझ्या मनात काय ते.....,
तिला कळत नसेल का....???

विचारल्या शिवाय राहवत नव्हत..,
विचारायचा धीर नव्हता..,
विचारीन विचारीन म्हणत ...,
फारच उशीर होत  होता....

खूप वेळ घालवून ...ठरवला एक दिवस...,
फोन करून तिला...पूर्ण विचार मांडला...,
काहीच न कळता..लगेचच उत्तर आलं...,
विचार करून सांगते...लगेचच फोन मधून गजर झाला..

उत्तर नकारार्थी येणार...याची तर खात्रीच होती...,
पण मन मोकळं करायची..माझीही गरज होती...,
अखेर भविष्यवाणी खरी ठरली ..,
कारण फक्त कळले नाही मला ..

तिचाच विचार करतोय ..तेव्हापासून ते आत्तापरियंत...,
मनातील सांगून चुकलो तिला...संदेश पोचावतोय तिच्या परियंत..
कितीही समजावला तरीही ..समाधान काय होत नाही...
म्हणूनच म्हणतात कि काय....
वेड मन हे कधी ऐकतच नाही....



विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५