प्रारब्ध (गमन)

Started by केदार मेहेंदळे, February 21, 2012, 11:06:13 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 
नशिबाला कंटाळून
ठरवलं जायचं पळून
बोचकं कपड्यांचं
अंगणात ठेवलं लपवून

रात्री सगळे झोपल्यावर
घरा बाहेर पडलो
लपवलेलं बोचकं घेऊन
रस्त्याला लागलो

रस्त्यावर मात्र त्यावेळी
नव्हतो मी एकटा
माझ्यामागे चालत होता
कोणी तरी भामटा

घाबरून विचारलं "कोण तू?
का लागलायस पाठी?"
म्हणाला तो "प्रारब्ध  तुझं
तू तिथे मी"


केदार....
(माझ्या गमन ह्या संग्रहातून)

मोक्ष (गमन)

http://marathikavita.co.in/index.php/topic,7666.msg24488.html#msg24488

मुक्तातमा (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,7418.0.html

dinesh pawar



shivnath