दुसरं प्रेम!

Started by designer_sheetal, February 21, 2012, 05:23:31 PM

Previous topic - Next topic

designer_sheetal

नुकताच valentines day येवून गेला. खूप दिवसांपासून ती वाट पाहत होती या दिवसाची. निदान आज तरी तो फोन करेल अशी वेडी आशा होती तिला... पण तो तर तिला कधीच विसरून गेला होता... तिला मात्र तीच पहिलं प्रेम विसरणं फार कठीण जात होतं.

असं म्हणतात कि आयुष्यात खरं प्रेम एकदाच होतं. पण तसं अजिबात नसत, मुळात प्रेम कधी खरं किवा खोटं नसतं. प्रेम हे नेहमीच खरं असतं मग ते पहिलं असो वा दुसरं. प्रेमात पडायला  मर्यादा नसतात. काही वेळा असं होतं कि आपण चूकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो कालांतराने लक्षात येतं कि समोरची व्यक्ती आपल्या अजिबात योग्यतेची नाही. पण डोक्यात काही चुकीच्या कल्पना रुजलेल्या असतात... पहिलं प्रेम, प्रेम फक्त एकदाच होत वगैरे वगैरे. मग या दडपणाखाली नको असलेल्या नात्याचा एकतर स्वीकार केला जातो ज्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात  किव्वा प्रेमभंगाच्या धक्क्याने काहीजण आत्मघात करायलाही पुढे मागे पहात नाहीत.

जर पहिले प्रेम यशस्वी नाही झाले तर पुन्हा प्रेम करायचंच नाही असं म्हणण चूकीचं आहे. चूका प्रत्तेक गोष्टीत होतात भाजी घेताना नाही का एखादा टोम्याटो बाहेरून खूप छान रसरशीत दिसतो पण आतून किडलेला असतो. तेव्हा आपण ती भाजी खाणं सोडून देतो का? जोडीदार निवडतानाहि चूक होऊ शकते. आयुष्य कधीही कोणासाठी थांबत नसतं. मग स्वताचा अमूल्य वेळ अयोग्य व्यक्तीच्या विचारात का घालवा? जे प्रेम यातना देतं ते मूळी प्रेम नसतच. त्यासाठी स्वताच नुकसान करून घेण हा निव्वळ मूर्खपणा आहे. जर पहिलं प्रेम तुम्हाला यातना देवून गेलय तर नक्कीच विचार करा दुसऱ्या प्रेमाचा पण डोळसपणे.


शीतल
http://designersheetal.blogspot.in/

http://kaladaalan.blogspot.in/


santoshi.world

nice ... i like it .. :)
असं म्हणतात कि आयुष्यात खरं प्रेम एकदाच होतं. पण तसं अजिबात नसत, मुळात प्रेम कधी खरं किवा खोटं नसतं.
प्रेम हे नेहमीच खरं असतं मग ते पहिलं असो वा दुसरं.

designer_sheetal


jyoti salunkhe


designer_sheetal


utkarsh


Sachin Ghodke

Khup surekh.....!
mala khup aavadal.
SEETAL